Desh

दिल्लीत अरविंद केजरीवाल- राहुल गांधींची हातमिळवणी 

By PCB Author

March 05, 2019

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) –  काँग्रेसविरोधात रान उठवून सत्ता काबीज करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधी आणि केजरीवाल एकत्र येण्याचे संकेत  मिळत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि आप युती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीत लोकसभेच्या ७ जागा  आहेत. आप आणि काँग्रेस प्रत्येकी ३  जागा लढवणार आहेत.  तर एका जागेवर भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा  यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस-आपला भोपळाही फोडता आला नव्हता. ७  जागांवर भाजपने विजय मिळवला होता. काँग्रेसच्या मागे लागून थकलो, पण आघाडीसाठी त्यांच्याकडून कोणताही संपर्क होत नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते.