दिल्लीतील मयूर विहार मध्ये १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू; बर्ड फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता

0
270

दिल्ली,दि.०८(पीसीबी) – बर्ड फ्लूची दहशत देशभर पसरल्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्येही या धोक्याची शक्यता वाढली आहे. राजधानी दिल्लीतील मयूर विहार फेज -3 मध्ये असलेल्या सेंट्रल पार्कमध्ये १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बाब संज्ञानात येताच दिल्ली सरकारने डॉक्टरांच्या एका टीमला घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहे. हि एका दिवसाची घटना नसून गेल्या काही दिवसांत या कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभागच्या म्हणण्या नुसार बर्ड फ्लूबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही, शक्यतो जास्त थंडीमुळे या कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत कावळे तपासासाठी पाठविण्यात आले आहेत, तपास अहवाल आल्यानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल, परंतु बर्ड फ्लूने देशातील काही राज्यांमध्ये पसरला आहे, त्यानंतर दिल्लीत संशयास्पद स्थितीत कावळ्यांचा मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. आहे.

तसेच गुरुग्राममधील एनसीआर शहर सेक्टर–56 मधील बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये शुक्रवारी सहा कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. काही दिवसांपासून पार्कमध्ये कावळे मरत असल्याचे समजत होते, त्यानंतर वन्यजीव व पशुसंवर्धन विभागाची टीम आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उद्यानात पोहोचली. मृत कावळ्यांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना तपासासाठी जालंधर येथे पाठविण्यात आले आहे.

मात्र, गाझियाबादमध्ये बर्ड फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही आणि जिल्हा प्रशासनाकडून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.