Desh

दिल्लीतील भाजप मुख्यालयातील पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्त्यावर बूट फेकला  

By PCB Author

April 18, 2019

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – साध्वी प्रज्ञा यांचा भाजपप्रवेश व त्यांना भोपाळमधून देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भात माहिती देताना भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट फेकण्यात आला. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात ही घटना आज (गुरूवार)  घडली.

बूट फेकणाऱ्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी  करण्यात येत आहे. या व्यक्तीचे नाव शक्ती भार्गव असे आहे. तो व्यवसायाने डॉक्टर असल्याचे  समजते. भार्गव याने बूट फेकल्यानंतरही राव यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पत्रकार परिषद सुरू ठेवली.

दरम्यान, बूट फेकणाऱ्या व्यक्तीने एखाद्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केले असेल तर ते दुर्दैवी आहे. हे अत्यंत चुकीचे वर्तन आहे. लोकशाहीच्या विरोधात आहे, असे भाजप प्रवक्ते नलीन कोहली यांनी  म्हटले आहे.