Desh

दिल्लीतील भाजपचे मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

By PCB Author

June 22, 2019

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – दिल्लीतील भाजपचे मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज (शनिवार) देण्यात आली आहे. यामुळे राजधानीत खळबळ उडाली आहे. दिल्लीत  के ५ ए दीनदयाल उपाध्याय मार्गावर भाजपचे कार्यालय आहे. धमकीनंतर येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मध्य दिल्लीचे डीसीपी यांनी सांगितले की, धमकीचा फोन कर्नाटकातील म्हैसूरमधून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  कर्नाटक पोलिसांशीही संपर्क साधला जात आहे.

भाजप मुख्यालयातील कंट्रोल रुममध्ये आज ( शनिवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला. हा धमकीचा फोन कर्नाटकातील म्हैसूरमधून आल्याचे निदर्शनास आले आहे.  फोन करणाऱ्याचा शोध  लागला असून त्याचे नाव जाहीर केलेले नाही.

दरम्यान, फोन करणारा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही त्याने अशा प्रकारचे फोन केले आहेत. परंतु, प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.