Bhosari

दिलेले पैसे परत न करता खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने केएसबी चौकातील ब्रीज वरुन उडी घेत नामदेव भुसनरची आत्महत्या

By PCB Author

May 21, 2019

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – दिलेले पैसे परत न करता खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तनावात आलेल्या नामदेव भुसनरने केएसबी चौकातील ब्रीज वरुन उडी घेत आत्महत्या केल्याचे भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. नामदेव ने २९ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी अण्णा काशीनाथ सदगर, मीना गोविंद मुलगीर, मारोतराव धनाजी गयाळ (रा. परभणी), ज्ञानोबा मारोतराव गयाळ, किसन महादु यमगर (वय ४५, रा. सांगवी) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे नामदेव यांच्या सासरकडची मंडळी आहेत. काही दिवसांपूर्वी नामदेव यांनी त्याना पैसे उसने दिले होते. बरेच दिवस उलटून देखील त्यांनी ते पैसे नामदेव याला परत केले नव्हते. यामुळे नामदेवने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. यावर आरोपींनी पैसे मागु नकोस, तुला बघुन घेतो, तु पत्नीला त्रास देतो असा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली होती. यामुळे हताश झालेल्या नामदेव याने २९ एप्रिल रोजी केएसबी चौकातील ब्रीज वरुन उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक डेरे तपास करत आहेत.