दिलासादायक! कोरोनाचा जोर ओसरला; गेल्या ८८ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

0
258

नवी दिल्ली , दि. २१ (पीसीबी) : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. ICMR च्या माहितीनुसार आतापर्यंत देशात ३९,२४,०७,७८२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासात १३,८८,६९९ करोना चाचण्या करण्यात आल्या.

रविवारी देशात ५२,२५६ नवीन करोना रुग्ण सापडले. तर ७७,१९० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं असल्याचं दिलासादायक चित्र आहे. देशात काल (रविवार) १४२२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या ८८ दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे. यापुर्वी २३ मार्चला ४७,२३९ रूग्ण आढळले होते. त्यानंतर करोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला.

देशात आतापर्यंत २,९९,३५,२२१ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २,८८,४४,१९९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच ३,८८,१३५ बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ७ लाख ०२ हजार ८८७ बाधित रुग्णांवर उपचार सूरु आहेत.