Desh

दिलासादायक! आरबीआयने कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिने वाढवली

By PCB Author

May 22, 2020

नवी दिल्ली, दि. २२(पीसीबी) – आरबीआयने कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिने वाढवली आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या या घोषणेचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.

त्यामुळे ऑगस्टपर्यंत आता कर्ज भरलं नाही तरी चालणार आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैसा रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच येणाऱ्या मान्सूनकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषद घेऊन दास यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

दरम्यान कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आरबीआयने पुन्हा मोठे निर्णय घेतले आहेत. रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 4.40 टक्कांवर असलेला रेपो रेट आता 4.0 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे.