Pimpri

दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका चिमूकलीचा मृत्यू

By PCB Author

February 05, 2022

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) : दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका चिमूकलीचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे.

राजस्थान येथून दिघी येथे आलेले कुटुंब जनावरांच्या गोट्यात काम करते. आज सकाळी दूध घेऊन मुलांचे वडील बाहेर गेले होते. त्या दरम्यान आपटी बॉम्ब सारखी वस्तू फुटली आणि यामध्ये कामगाराची मुलगी व इतर दोघे जखमी झाले.

जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा आपटी बॉम्ब कुठून आणि का आणला?, नक्की काय प्रकार घडला? याचा तपास पोलीस करत आहेत.

पंधरा वर्षांपूर्वी दिघी येथील लष्कराच्या सराव मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांनी तिथे पडलेले बॉम्बचे शेल उचलून शास्त्रीनगर येथील मैदानात खड्डा खोदून गाडले आणि दगडाने ते फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो शेल नसून जीवंत बॉम्ब जागेवर फुटला आणि त्यादुर्घटनेत पाच बालकांचा जागेवर मृत्यू झाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या.