दिघीमध्ये दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी पळवले ५७ हजारांचे दागिने

0
634

दिघी, दि. १८ (पीसीबी) – घरातील लोक घराला कुलूप लावून कामाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदिचे एकूण ५७ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि.१७) सकाळी दहा ते दुपारी सव्वातीनच्या दरम्यान दिघीतील साई पार्क रोड, नितीन मारुती झपके यांच्या बिल्डींगमध्ये घडली.

याप्रकरणी नागनाथ खंडेराव भोरे (वय ४६, रा. साई पार्क रोड, नितीन मारुती झपके यांची बिल्डींग) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास भोरे कुटूंबीय दिघी येथील राहत्या घराला कुलुप लावून कामाला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात ठेवलेले ५७ हजारांचे सोन्या-चांदिचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.