दिघीत वॉकींगला गेलेल्या इसमाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

0
405

दिघी, दि. २१ (पीसीबी) – पहाटेच्या वेळेस वॉकींगला गेलेल्या एका इसमाचा भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२०) पहाटे पावणेसहाच्या सुमारास दिघीतील तलेरा गोडाऊन गेटच्याजवळ घडली.

सुरेश रघुनाथ गवळी असे मृत इसमाचे नाव आहे. तर आरोपी ट्रकचालक ट्रकसह फरार झाला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवार पहाटे पावणेसहाच्या सुमारास सुरेश गवळी हे नेहमी प्रमाणे दिघीतील तलेरा गोडाऊन गेटजवळच्या रस्त्यावर वॉकींगला गेले होते. यावेळी भरधाव अज्ञात ट्रकचालकाने त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला. या घटनेत गंभीर जखमी झाले्लया सुरेश यांचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.