Notifications

दिघीत वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन खून; गुन्हा लपवण्यासाठी धड आणि मुंडके केले वेगळे

By PCB Author

December 07, 2018

दिघी, दि. ७ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन दोघा वेटरांनी मिळून एका विटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन त्याचा खून केला. तसेच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघा आरोपींनी चाकूने वेटरचे मुंडके कापून धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि पसार झाले. ही धक्कादायक घटना चऱ्होली रोडवरील हॉटेल नानाश्री अलंकापूरम येथे घडली.