दिघीत मुलींकडून वेश्यागमन करुन घेणाऱ्या लॉज मालकासह मॅनेजरला अटक; सात मुलींची सुटका

0
1767

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – दिघी येथील मोशी आळंदी रोडवर असलेल्या ‘आमंत्रण लॉजींग’ या लॉज मध्ये पैशांचे अमिष दाखून मुलींकडून वेश्यागमन करुन घेणाऱ्या लॉज मालकासह मॅनेजरला सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी आणि दिघी पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अटक केली आहे.

लॉजींगचे मालक विजय बबन शिवले (वय ४१, रा. डुडुळगाव, आळंदी-मोशी रोड)  आणि लॉजचा मॅनेजर वैजनाथ नरहरी बाबर (वय २७, रा.निलम हॉटेलचे वर रुम.नं.२, देहुफाटा, मोशी आळंदी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१२) सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस हवालदार रमेश लोहकरे यांनी दिघी येथील ‘आमंत्रण लॉजींग’ या लॉज मध्ये मुलींना पैशांचे अमिष दाखवून वेश्यागमन करुन गेतले जात असल्याची खात्रीशीर माहिती दिली. यावर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि दिघी पोलिसांनी संयुक्तरित्या ‘आमंत्रण लॉजींग’ या लॉजवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणाहून सात मुलींची सुखरुप सुटका केली. तसेच आरोपी लॉज मालक विजय शिवले आणि लॉजचा मॅनेजर वैजनाथ बाबर यांना अटक केली. त्याच्याविरुध्द दिघी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन हजार रुपये रोख, दोन मोबाईल, लाईट बील आणि बँकेचे पासबूक ताब्यात घेतले आहे. तर पिडीत मुलींना मोशी येथील चैतन्य रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल भालेकर, सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव शेलार, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, ननिता येळे, कविता गायकवाड, गीतांजली जाधव, तुषार आल्हाट, नितीन लोंढे, सतिश ढोले, संदीप गायकवाड, सुनिल नाईक, सचिन शिंदे, रुपाली चांदगुडे, सरस्वती कांगणे आणि दिघी पोलीस ठाण्यातील स्टाफने संयुक्त रित्या केली आहे.