दिघीत ‘मी बोलवल्यावर का नाही आलास’ अशी विचारणा करुन अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार

0
2233

दिघी, दि. २ (पीसीबी) – ‘मी बोलवल्यावर का नाही आलास’ अशी विचारणा करुन एका अल्पवयीन मुलाने कॉलेजच्या गेटवर थांबलेल्या एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दिघीतील ज्ञानबा सोपानराव मोजे कॉलेज येथे शनिवारी (दि.१) दुपारी पावनेबाराच्या सुमारा घडली.

विशाल गंगाधर मेंडके (वय १६, रा. कॉलनी नं.१, लक्ष्मीनारायणनगर, वडमुखवाडी) असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनिस रौफ सय्यद उर्फ सल्या (वय १६, रा. कारवा आनंद आश्रमच्या पाठीमागे, हनुमानवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल आणि आरोपी अनिस हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते दोघेही अल्पवयीन आहेत. शनिवारी सकाळी पावनेबाराच्या सुमारास विशाल दिघीतील ज्ञानबा सोपानराव मोजे कॉलेजच्या गेटजवळ उभा होता. यावेळी अनिसने विशाल आवाज देऊन बोलवले. मात्र विशाल त्याच्याकडे गेला नाही. या गोष्टीचा राग मनात धरुन अनिस याने विशाला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच काही वेळाने पुन्हा मागून येऊन विशालवर धारदार शस्त्राने दोन्ही हातांवर आणि पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. विशालवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिसला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.