दिघीत मित्राच्या पत्नीला लॉजवर बोलवून विनयभंग; रोख दीड लाखही पळवले

0
696

दिघी, दि. ११ (पीसीबी) – पतीने दीड लाख रुपये घेऊन बाहेर बोलावले आहे, असे खोटे सांगून मित्राच्या पत्नीला एका लॉजवर बोलवून घेत तिचा विनयभंग केला. तसेच तिने आणलेले दीड लाख रुपायांची रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाला. ही घटना १७ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत मॅगझीन चौक दिघी येथे घडली.

याप्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोकुळ गिरी (रा. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्याने १७ जानेवारी रोजी महिलेला फोनकरून सांगितले की, तिच्या पतीने दीड लाख रुपये घेऊन दिघी मधील मॅगझीन चौकात बोलावले आहे. त्यानुसार पीडित महिला घरातील दीड लाख रुपये घेऊन मॅगझीन चौकात गेली. त्यानंतर आरोपीने तिला तिथल्याच एका लॉजवर नेले. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेने आणलेले दीड लाख रुपये जबरदस्तीने घेऊन पळ काढला.  गोकुळ याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस तपास करत आहेत.