दिघीत धक्का लागल्याचे नाटक करुन तरुणाची दुचाकी पळवली

0
635

दिघी, दि. १६ (पीसीबी) – तरुणाजवळील दुचाकीचा धक्का लागल्याचे नाटक करुन तिघाजणांनी मिळून धमकावत त्याच्याजवळील मोपेड दुचाकी, एक मोबाईल आणि हेडफोन असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी (दि.१४) रात्री सव्वाअकराच्या सुमारास दिघी जकात नाक्याजवळ घडली.   

याप्रकरणी शुभम सुरेशराव देशमुख (वय २२, रा. अदवेद बंगला, गजानन महाराजनगर, तालेरा गोडाऊनमागे, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हे शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांच्या मोपेड दुचाकीवरुन (क्र. एमएच/१४/एचएफ/१४७४) दिघी जकात नाका येथून जात होते. यावेळी अनोळखी तिघे आरोपी अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आले आणि त्यांनी, शुभम यांना, ‘आमच्या अंगावर गाडी घालतो का, तुझ्या गाडीचा मला धक्का लागला मला भरपाई दे असे बोलून त्यांच्याजवळील अॅक्टीव्हा मोपेड दुचाकी (क्र. एमएच/१४/एचएफ/१४७४), एक मोबाईल आणि एक हेडफोन असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. याप्रकरणी तिघा अनोळखी इसमांविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.वाय.सोलापुरे तपास करत आहेत.