Bhosari

दिघीत तरुणीला ब्लॅकमेल करुन वेळोवेळी बलात्कार

By PCB Author

June 23, 2019

दिघी, दि. २३ (पीसीबी) – एका २० वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. तरुणीला न कळत त्याचे चित्रीकरण केले. आणि घरच्यांना ती चित्रफीत दाखवण्याची धमकी देऊन वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. ही धक्कादायक घटना दिघी येथील तरुणीसोबत घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मालेश्वर कावडे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते मे २०१९ या कालावधीत आरोपी मालेश्वर याने पीडित तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती शरीर संबंध प्रस्तापित केले. याचे त्या नराधमाने तरुणीच्या न कळत चित्रीकरण केले. तसेच ती चित्रफीत तुझ्या घरच्यांना दाखवीण अशी धमकी देत ब्लॉकमेन केले. आणि वेळेवेळी आकुर्डी प्राधिकरण, स्पाईन रोड, आळंदी आणि डुडुळगाव या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. आरोपी मालेश्वर अद्याप फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही.एन.माने तपास करत आहेत.