दिघीत जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना जबर मारहाण

0
418

दिघी, दि. २७ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून सहा जणांच्या टोळक्यांनी वडिल, मुलगा आणि मुलगी या तिघांना जबर मारहाण करुन मोबाईल फोडून नुकसान केले. ही घटना बुधवार (दि.२६) दुपारी दिडच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली.

याप्रकरणी प्रियंका भाऊसाहेब तापकीर (वय २४, रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर तापकीर, चंद्रकांत तापकीर, अशोक तापकीर, तुषार तापकीर, राजाराम तापकीर, सुदाम तापकीर (सर्व रा. वडमुखवाडी) या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद प्रियंका आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीचा वाद आहे. बुधवारी या कारणावरुन सहाही आरोपींनी फिर्यादी प्रियंका यांच्या भावाला आणि वडिलांना घराबाहेर बोलवून मारहाण केली. यावेळी प्रियंका या मध्यस्ती करण्यासाठी गेल्या असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा मोबाईल फोडून नुकसान करण्यात आले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दिघी पोलीस तपास करत आहेत.