दिघीतील बांधकाम साईटवर पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

0
687

दिघी, दि. ६ (पीसीबी) – बांधकाम साईटवर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.३) सकाळी सातच्या सुमारास दीघी बोपखेल येथील गणेशनगर गल्ली नं.७ समर्थ रेसिडेन्सी फेज-३ येथील बांधकाम साईटवर घडली.

रितु यादव (वय ३, रा. बोपखेल येथील गणेशनगर गल्ली नं.७ समर्थ रेसिडेन्सी फेज-३ येथील बांधकाम साईट) असे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी दीघी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मधुकर गिरी यांनी दीघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम ठेकेदार मोहन किसन पवार (वय २६, कॉलनी नं.३, गणेशनगर बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपखेल येथील गणेशनगर गल्ली नं.७ समर्थ रेसिडेन्सी फेज-३ येथील बांधकाम साईट सुरु आहे. या ठिकाणी बांधकामाच्या कामासाठी पाण्याच्या दोन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना झाकण बसवण्यात आले नव्हते, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास या बांधकाम साईटवरील कामगार विनोद यादव यांची ३ वर्षांची मुलगी रितु यादव या पाण्याच्या टाकीजवळ खेळक होती खेळता खेळता ती पाण्याच्या टाकीत पडली आणि पाण्याच्या टाकीत बुडून तिचा मृत्यू झाला. यावेळी या बांधकाम साईटवरील  पाण्याच्या टाकीवर झाकण बसवण्यात आले नव्हते तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुवीधा नव्हती म्हणून चिमुकलीचा जीव गेल्याने बांधकाम ठेकेदार मोहन किसन पवार यांच्याविरोधात कलम३०९/१८ प्रमाणे गुन्हा दाल करण्यात आला आहे. दिगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गिरी तपास करत आहेत.