दारू पिऊन पत्नीला मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

0
502

वाकड, दि. २१ (पीसीबी) – पतीने दारू पिऊन पत्नीला मारहाण केली. तसेच दोघांनी शिवीगाळ केली. तिघांनी विवाहितेच्या पतीला विवाहितेच्या विरोधात सांगून भडकावल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 मे 2013 पासून 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली.

पती कलीम मुस्तफा पठाण (वय 32, रा. लातूर), मुस्तफा पठाण (वय 68), अहमद मुस्तफा पठाण आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 20) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपी कलीम याने दारू पिऊन घरातील किरकोळ कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. सासू आणि दोन नणंदांनी कलीम याला विवाहितेबाबत उलटसुलट सांगून विरोधात भडकवले. त्यामुळे कलीम याने विवाहितेला मारहाण केली. सासरे आणि दिराने देखील विवाहितेला घरगुती कारणावरून शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.