दारु पिऊन शिवशाही बस चालवणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी केले अटक

0
434

पुणे, दि. २० (पीसीबी) – दारू पिऊन शिवशाही बस चालवणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

पवन जगन तोडकर असे अटक करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस स्वारगेट एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारातून विरुद्ध दिशेने जात होती. हा प्रकार स्वारगेट पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्यास बस थांबविण्यास सांगून त्याची चौकशी केली. तसेच ब्रिथ अॅनलायझरद्वारे त्याची तपासणी केली. तेव्हा, तोडकर हा दारू पिऊन बस चालवीत असल्याचे निदर्शनास आले. त्याने वाहन चालविण्याचा परवानाही स्वतःजवळ बाळगलेला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्यास तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली. स्वारगेट पोलीस तपास करत आहेत.