Maharashtra

दारुच्या पैशातून मिळणारा महसूल महिलांचा शाप; राज्य सरकारने तो स्वीकारु नये – तृप्ती देसाई

By PCB Author

April 23, 2020

महाराष्ट्र,दि.२३(पीसीबी) – दारुच्या पैशातून मिळणारा महसूल हा महिलांचा शाप आहे त्यामुळे राज्य सरकारने तो स्वीकारु नये, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई राज्य सरकारकडे केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा, अशी मागणी केली आहे. या मागणीला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विरोध केला आहे. दारूच्या पैशातून महिलांचा शाप मिळणारा महसूल राज्य सरकारने लॉकडाऊन परिस्थितीत स्वीकारू नये, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजसाहेब…महसूल निर्माण करता येईल आणि राज्याचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर आणता येईल, पण महिलांचे शाप मिळणारा महसूल वाईन शॉपमधून सरकारला मिळतो. एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत. राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं आहे.