Notifications

दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती – अजित पवार

By PCB Author

April 20, 2019

पुणे, दि. २० (पीसीबी) – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल जे विधान केले आहे. त्या बद्दल भाजपकडून कोणी बोलण्यास तयार नसून ही निषेधार्थ बाब आहे. त्यामुळे हे भाजपवाले देशातील विचारवंत दाभोळकर, कलबुर्गीचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवारांची प्रचार सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरुर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.