दाभोलकरांच्या हत्येपूर्वी घटनास्थळावर आणखी दोघेजण होते    

0
908

पुणे, दि. १५ (पीसीबी) –  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांना ओळखणारे दोघे आधीच पोहोचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे दोघे पुलावर आले, अशी नवी माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. या दोघांचा शोध सीबीआयने सुरु केला आहे.

दाभोलकर पुलावर आले तेव्हा शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी  हेच दाभोलकर असल्याची खात्री  तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून करून घेतली.  त्यानंतरच  दाभोलकरांवर  गोळ्या  झाडण्यात  आल्या. कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण  हत्येच्या कटात सहभागी होते, अशी माहिती  सीबीआयच्या तपासात समोर आली आहे.

वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी चार पिस्तुलांची विल्हेवाट लावली आणि तोडून ते खाडीमध्ये फेकून दिले, असेही तपासात समोर आले  आहे. ती जागा  ठाण्यातील कळवा पूल, वसईमधील  खाडी पूल किंवा कल्याणमधील खाडी पूल  यापैकी एक जागा होती. मात्र,  रात्रीची वेळ असल्याने या तीनपैकी नक्की कोणत्या जागी पिस्तुलाचे तुकडे टाकले हे शरद कळसकरला आता आठवत नाही. त्यामुळे त्याची आणखी चौकशी करण्यात येणार आहे.