Pimpri

दापोडीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

By PCB Author

January 17, 2019

दापोडी, दि. १७ (पीसीबी) – रेल्वेची जोरदार धडक बसल्याने एका एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास दापोडी येथे घडली.

भगवान गोपीनाथ गायकवाड (वय ४५, रा. वॉर्ड नं. ५, बोपोडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत भगवान गायकवाड यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याकडील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटवली. लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत.