दापोडीत दुकानाचे लॉक तोडून ८७ हजारांची रक्कम चोरट्यांनी केली लंपास

0
642

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून ८७ हजारांची रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवार (दि.२४) रात्री दहा ते गुरुवार (दि.२५) सकाळी सहाच्या दरम्यान दापोडी येथे घडली.

याप्रकरणी दुकान मालक अब्दुल कादर खान (वय ५४, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान यांचे दापोडी येथे साई बाबा मंदिराजवळ दुकान आहे. बुधवार ते गुरुवारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील कपाटामध्ये ठेवलेली ८७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. गुरुवारी सकाळी खान दुकानात आले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने भोसरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काठोरे चोरट्यांचा शोध घेत आहेत.