दापोडीत घराशेजारी लावलेली महागडी कार चोरट्यांनी पळवली

0
1853

दापोडी, दि. १८ (पीसीबी) – घराशेजारी लावलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा कार अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१५) सायंकाळी पाच ते शुक्रवारी (दि.१६) सकाळी दहाच्या दरम्यान दापोडी येथील वॉर्ड क्र.५ मधील पीलाजी काटे चाळ येथे घडली.

याप्रकरणी कारचे मालक सचिन तुकाराम साबळे (वय ३५, रा. दापोडी, वॉर्ड क्र.५, पीलाजी काटे यांची चाळ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे ड्रायवर असून त्यांच्याकडे स्वत:ची टोयोटा इनोव्हा (एमएच/१४/सीएक्स/९८८९) या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरुन आल्यावर त्यांनी कार ते राहत असलेल्या दापोडी येथील वॉर्ड क्र.५ मधील पीलाजी काटे चाळ येथे लावली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरुन नेली. कारची अंदाजे किंमत साडेचारलाख रुपये आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.