दापोडीत अल्पवयीन तरुणीची छेड काडून विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

0
557

दापोडी, दि. १९ (पीसीबी) – एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन छेड काडून विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१८) दापोडी येथे रात्री उशीरा करण्यात आली.

जोसेफ अन्थोनी देवनेसन (वय ४०, रा. महात्मा फुलेनगर, मराठी शाळेजवळ, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिडित १६ वर्षीय मुलगी ही दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेच्या समोरील रस्त्यावर पायी चालली होती. यावेळी तिची टिकळी खाली पडली म्हणून ती खाली वाकली. यावेळी आरोपी रिक्षाचालकाने तिच्या पाठीमागून हात फिरवला आणि घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास, “तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून तुझे तोंड विद्रुप करेन”, अशी धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत तरुणीने आईला सांगितले. यावर पिडितेच्या आईने तातडीने भोसरी पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रात्री उशीरा आरोपी रिक्षाचालक जोसेफ याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक काबुगडे तपास करत आहेत.