दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात – अर्जुन खोतकर

0
444

जालना, दि. १९ (पीसीबी) –  “रावसाहेब दानवे हे माझी महेबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात,” अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधले प्रेम व्यक्त केले. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर खोतकर बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानतर एकच हशा पिकला.

जालन्यात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती. यावेळी भाषणादरम्यान प्रस्तावना देताना अर्जुन खोतकर यांनी दोघांच्या मैत्रीमधले प्रेम व्यक्त केले. खोतकर म्हणाले की, “यावेळी आपल्याला नवी इतिहास निर्माण करायचा आहे आणि रावसाहेब दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे. रावसाहेब दानवे आणि मी दोघेही ३० वर्षांचे जोडीदार आहोत. खरेतर रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात. ही जोडगोळी तीस वर्ष विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करते.”