Bhosari

दहा हजारांची लाच स्विकारताना ताथवडेतील महावितरणाच्या कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक

By PCB Author

July 27, 2018

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – विज कनेक्शन व मिटर हे ग्राहकांचे नावे करण्यासाठी दहा हजारांची लाच स्विकारताना महावितरणचा कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली.

गजानन सुरेश यादव (वय ३९, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक महावितरण कंपनी एमएसईडीसी ताथवडे शाखा) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय इसमाने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे एका बांधकाम व्यवसायीकाने इमारत विकसित केली आहे. त्या इमारतीमधील वीज कनेक्शन व मिटर ग्राहकांच्या नावे करून देण्यासाठी ताथवडे येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक गजानन यादवने ग्राहकांकडे १० हजार  रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. यावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आज शुक्रवार १०  हजार रुपयांची लाच स्वीकारताना गजानन यादवला रंगेहाथ अटक केली.