दहा रुपयाला जर थाळी दिली तर जनता आळशी बनेल -सदाभाऊ खोत

0
483

मुंबई,दि.२९(पीसीबी) – दहा रुपयात थाळी देण्याचे अश्वासन शिवसेनेने निवडणुकीच्या काळात दिले होते. त्याप्रमाणे राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत आहे. यावरूनचं माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या योजनेवर टीका केली आहे.

दहा रुपयाला जर थाळी दिली तर शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकत घेणार कोण?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.दहा रुपयात जेवणाची थाळी देणे म्हणजे सामान्य माणसाला आळशी बनवण्याला प्रवृत्त करणे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

जर सामान्य माणसाला दहा रुपयात जेवणाची थाळी दिली तर तो कष्ट करणार नाही. महिन्याला सहाशे रुपये मिळाले तरी पुरे झाले अशी त्याची मानसिकता बनेल. तसेच जेवण एवढं स्वस्त मिळालं, तर मग शेतकरी काबाडकष्ट करून जो भाजीपाला पिकवेल तो कोण खरेदी करणार? या योजनेचा शेतकऱ्यांना फटका बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी कोणतीही योजना सरकारने सुरू करू नये, असे खोत म्हणाले आहेत.