Maharashtra

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९६.९४टक्के

By PCB Author

June 17, 2022

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९६.९४टक्के राज्यात कोकण विभाग पहिला तर नाशिक शेवटी

पुणे: ९६.१६ नागपूर: ९७.०० औरंगाबाद: ९६.३३ मुंबई: ९६.९४ कोल्हापूर: ९८.५० अमरावती: ९६.८१ नाशिक: ९५.९० लातूर: ९७.२७ कोकण: ९९.२७ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.