दहावीचा निकाल ८ किंवा ११ जूनला लागण्याची शक्यता

0
505

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या दोन ते चार दिवसांनी लागणार असल्याचे संकेत आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार दहावीचा निकाल तयार असून तो शुक्रवार ८ जून किंवा सोमवार ११ जून यापैकी कुठल्याही दिवशी लागू शकतो. शिक्षण मंडळानं अधिकृतरीत्या याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतु मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी बोलताना ८ जून किंवा ११ जून रोजी निकाल जाहीर होऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

सकाळी ११ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल. सीबीएसईचा दहावीचा निकाल लागल्यानंतर या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यामध्ये झाल्या होत्या. एकूण १८ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यांचे या महत्त्वाच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. प्रशासकीय समस्यांमुळे निकाल जाहीर करण्यास किंचित विलंब होत असल्याचे सांगण्यात येत असून ही प्रतीक्षा लवकर संपावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करताना दिसत आहेत.

जकी अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी निकाल तयार असून तो ८ किंवा ११ जून रोजी लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी असे सांगण्यात येत आहे.

मंडळाचा प्रयत्न ८ जून रोजीच निकाल जाहीर करण्याचा असून ते शक्य न झाल्यास ११ जून रोजी तो निश्चित लागेल अशी सूत्रांची माहिती आहे.