दहशतवाद्यांप्रमाणेच हल्ले झाले, अाम्ही भयभीत झालाे; औरंगाबादच्या उद्याेजकांची भावना

0
1716

औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत. अशा प्रकारामुळे नवीन गुंतवणूक तर येणारच नाही, मात्र अाम्हीही दुसरीकडे कारखाने हलवावेत काय, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. स्वत: पाेलिस अायुक्त वाळूजमध्ये बंदाेबस्तावर असताना कंपन्यांना संरक्षण का मिळाले नाही, असा सवाल वाळूजच्या उद्याेजकांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कंपन्या बंद ठेवणार असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात येईल. तसेच जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद ठेवू, असा इशाराही उद्याेजकांनी दिला.

या पत्रकार परिषदेला सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उपाध्यक्ष कमलेश धूत, मसिआचे किशोर राठी, ‘एनआयपीएम’चे विश्वस्त मकरंद देशपांडे अादी उपस्थित हाेते. काेकीळ म्हणाले, ‘औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला आज सर्वात मोठा फटका बसला आहे. ही घटना निषेधार्हच अाहे. येथे बजाजने उद्योगांचा पाया रचला तर डीएमआयसीने कळस गाठला. मात्र या हल्ल्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. ताेडफाेड झाल्यानंतर पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले. ‘बंद’मुळे गुरुवारी अनेक कारखाने बंदच हाेते, अनेकांनी मेंटेनन्सची कामे हाती घेतली हाेती. बंद कारखान्यांवर हल्ले करून काय साधले, असा सवालही उद्याेजकांनी केला. कामगार संघटनांच्या नेत्यांचा या हल्ल्यामागे हात नसावा, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.