Desh

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल – इराण

By PCB Author

February 17, 2019

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला  मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिवोल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी बोलत होते.   

इराणमध्ये बुधवारी रिवोल्यूशनरी गार्ड्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ सैनिक शहीद  झाले आहेत. हा हल्ला दहशतवादी संघटना जैश-अल-अद्लने केल्याचा आरोप जाफरी यांनी केला. दहशतवादी आणि मुस्लीम धर्माला धोकादायक असलेले कुठे आहेत हे पाकिस्तान सराकारला माहित आहे. पाकिस्तानच्या सैनिकांचे या दहशतवाद्यांना समर्थन आहे,  असे जाफरी म्हणाले.

पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही या दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि पाकिस्तानला दहशतवादी पोसण्याची किंमत चुकवावी लागेल, अशा शब्दांत जाफरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.