दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल- नरेंद्र मोदी

692

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही असे सांगताना सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हल्ल्यानंतर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा इशारा दिला होता. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी शहिदांना आदरांजली वाहत पुन्हा एकदा पाकिस्तानचे नाव न घेता इशारा दिला आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असा इशारा मोदींनी दिला

आज प्रत्येक भारतीय शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आहे. देशात आक्रोश आहे, लोकांचा रक्त उसळत आहे हे मला कळत आहे. काहीतरी केले पाहिजे ही भावना स्वाभाविक आहे असे यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटले. लष्कराच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे सांगताना योग्य माहिती सुरक्षा यंत्रणापर्यंत पोहोचवावी जेणेकरुन दहशतवादाविरोधातील लढाई अजून तीव्र करता येईल असे नरेंद्र मोदींनी सांगितले.