‘दहशतवादाला धर्म नसतो’, विवेक ओबेरॉयचा कमल हासन यांना टोला

0
445

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – हिंदू दहशतवादाबाबत केलेल्या विधानामुळे अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. त्यातच आता बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमल हसन यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. ‘जसा कलाकाराला धर्म नसतो, तसाच दहशतवादालाही धर्म नसतो’, असे म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी कमल हसन यांना टोला लगावला आहे.

विवेक ओबेरॉयने ट्विटरच्या माध्यमातून कमल हसन यांच्यावर टीका केली आहे. “प्रिय कमल सर, तुम्ही उत्तम कलाकार आहात. ज्याप्रमाणे एखाद्या कलाकाराला धर्म नसतो, तसाच दहशतवादालादेखील धर्म नसतो. तुम्ही गोडसेला दहशतवादी म्हणून शकता. परंतु त्याच्या नावापुढे ‘हिंदू’ शब्द का वापरावा ? तुम्ही त्यावेळी मुस्लिमबहुल भागातमध्ये भाषण देत होतात. त्यामुळे काही मुस्लिम मते मिळावित यासाठी असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे ? आपण सारेजण एकच आहोत. त्यामुळे देशाचे विभाजन होईल असे वक्तव्य करु नका,” असे विवेकने म्हटले आहे. त्यासोबतच त्याने #अखंड भारत असे लिहिले आहे.