दहशतवादापासून त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही; आदिलच्या आईची खंत

0
769

श्रीनगर, दि. १६ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आदिलच्या शालेय जीवनात घडललेल्या एका घटनेमुळे तो दहशतवादाकडे वळला होता. मात्र, त्याला त्यापासून दूर करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र, त्यांने काही ऐकले नाही, अशी प्रतिक्रिया आदिल यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.    

आदिलची आई, वडील आणि चुलत भावाने त्याला दहशतवादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. एकदा शाळेत असताना त्याला पोलिसांनी जमिनीवर नाक घासायला लावले होते. तेव्हा ती घटना त्याच्या मनाला चटका लावून गेली होती, असे गुलाम हसन दार यांनी सांगितले.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी आदिलच्या कुटुंबीयांनी त्याच्या पार्थिवाशिवायच अंत्यविधी केला. आदिलच्या शरीराचे कोणतेच अवशेष मिळाले नसल्यामुळे त्याअभावीच अंत्यविधी केल्याचे  त्याचा नातेवाईक समीर अहमद याने सांगितले. आदिलला या वाईट मार्गापासून त्याला दूर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. पण, आम्हाला यश आले नाही, अशी खंत त्याच्या आईने व्यक्त केली.

आदिलने बारावी झाल्यानंतर धार्मिक शिक्षणाची वाट निवडली होती. मार्च २०१८ मध्ये सायकलवरुन तो घरातून निघून गेला होता. त्यानंतर कधीच तो परत आला नाही. त्या दिवशी कुटुंबीयांनी त्याला अखेरचे पाहिले होते, असे त्याच्या आईने सांगतिले.