दस्त नोंदणीत असाही गैरप्रकार

0
369

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुण्यातील एका सरकारी दुय्यम निबंधक कार्यालयात बाहेरील जमिनींची तसेच सदनिकांची दस्तनोंदणी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हे प्रकरण आता मंत्रालयापर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणात त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. प्रशासनाने केलेल्या तपासणीत आणखीनच मोठा घोटाळा समोर आला. एक दोन नव्हे तर हजारो दस्तांची गैर पद्धतीने नोंदणी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये 250 पेक्षा जास्त प्रकरणांत नियमबाह्य दस्तनोंदणी केल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये शहारात हजारो दस्तांची अशा पद्धतीने नोंदणी झाल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तुकडाबंदी असतानाही शासनाच्या नियमांची खिल्ली उडवत पुणे शहरात काही हजार दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे.पुण्यात मागील तीन वर्षांत हजारो दस्तांची नोंदणी नियमबाह्य पद्धतीने केली असल्याचं दिसतंय. त्यामुळे पाच गुंठ्यांच्या आतील किंवा आठ सदनिकांच्या आतील प्रकल्पांसाठी नोंदणीची आवश्यकता नाही. पण त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पासाठी महारेराकडे नोंदणी करणं बंधणकारक असतं. मात्र पुण्यात गैरपद्धतीने नोंदण्या झाल्याचा प्रकार समोर आला.

दरम्यान, पुण्यातलं हे प्रकरण आता मुंबईतील मंत्रालयापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांमुळे सध्या जागेचा प्रश्न समोर येतात. त्यामुळे जमिन विक्रीतील घोटाळे आणि गैरनोंदणीचे प्रकार समोर येत आहेत.