दसऱ्याच्या दिवशी ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्यांचा ज्वेलर्सच्या दुकानात डल्ला

0
379

वाकड,दि.२७(पीसीबी) – दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या तीन चोरट्यांनी दुकानातील 55 हजारांच्या दागिन्यावर डल्ला मारला. ही घटना ताथवडे येथील प्रियांका ज्वेलर्समध्ये घडली.

सुनीता कैलास वर्मा (वय 51, रा. मेकडोना मेनर सोसयटी, वाकड) यांनी सोमवारी (दि. 26) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दोन महिलांसह तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या दुकानात तीन अनोळखी व्यक्‍ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या. त्यांनी फिर्यादी सुनीता यांचे लक्ष विचलित करून 11 ग्रॅम वजनाचे 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरी करून नेले. हा प्रकार अवघ्या 15 मिनिटात घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.