Chinchwad

दळवीनगर येथील पंढरीनाथ दळवी यांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

By PCB Author

June 26, 2019

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत जिजाबाई महिला दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना दळवीनगर येथील पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प जालिंदर काळोखे महाराज, प्रवचनकार सुप्रियाताई ठाकुर (पाटील) दिंडी मालक विजयाताई साठे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे  मंगळवारी औद्योगिकनगरीत आगमन झाले. आकुर्डीत पालखीचा मुक्काम झाला. त्यामध्ये संत जिजाबाई महिला दिंडी देहू ते पंढरपूर वारीत सहभागी होत असते.

यावेळी अनिकेत दळवी मित्र परिवाराच्या वतीने संत जिजाबाई महिला दिंडीतील सहभागी वारकऱ्यांसाठी साड्या व पोषाख देण्यात आले व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले.