दरवाजा उघडा राहिला आणि चोरांनी भर सकाळी ४६ हजारांचा ऐवज चोरून नेला

0
461

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – भोसरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ४६ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. १३) सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजताच्या कालावधीत धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

वसुंधरा राजेश सोनवणे (वय २६, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून देल कंपनीचा एक लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम तसेच आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट व डेबिट कार्डचोरून नेले. हा प्रकार अवघ्या १५ मिनिटात घडला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.