Pimpri

दरवाजा उघडा ठेवणं पडलं महागात; चोरट्यांनी घरात प्रवेश करत

By PCB Author

June 09, 2021

चाकण, दि. ९ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना 7 जून रोजी रात्री नाणेकरवाडी येथे घडली.

संग्राम हरी आबगे वय 26, रा. नाणेकरवाडी, ता. खेड यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर सात जून रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडे होते. उघडा दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.