Pimpri

दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला; ‘एवढ्या’ लाखांचा माल चोरीला

By PCB Author

July 20, 2021

निगडी, दि. २० (पीसीबी) – निगडी प्राधिकरण मधील सिंधूनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून नऊ लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 18) रात्री दहा वाजता उघडकीस आली.

मंगला शामकांत वगद (वय 54, रा. सिंधूनगर, प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी (दि. 17) दुपारी तीन ते रविवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत मध्ये प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 9 लाख एक हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.