Others

दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे, माहितीये…

By PCB Author

December 23, 2020

आपल्या घरात आपले आजी आजोबा आपल्याला त्यांच्या काळातल्या गोष्टींची सारखी माहिती सांगत असतात. कि, आमच्या वेळी असं होत, आमच्या वेळी तस होत. शिवाय ते हे सुद्धा न विसरता सांगतात कि आमची जगण्याची पद्धत तुमच्या पेक्षा वेगळी होती. आणि काय खोत आहे त्यामध्ये. आत्ताची जगण्याची शैली हि आधी पेक्षा खूपच वेगळी आहे. आधी जेवण चुलीवरती बनत होती आता गॅसवरती बनतात.

आधी लोक गार हवा खाण्यासाठी अंगणात बसायचे आता AC ने ती गार हवा द्यायला सुरुवात केली. आधी तांब्याच्या भांड्यामधे आपण खायचो प्यायचो आता स्टील, अल्युमिनियम ने घेतली. पण बऱ्याचदा आपल्याकानावर पडत कि, तांब्याच्या भांड्यांचा उपयोग हा शारीसाठी खूप उपयुक्त असतो. शिवाय आयुर्वेदात सुद्धा म्हटले आहे कि, की तांब्याचे पाणी शरीरातील बऱ्याच दोषांना पूर्ण शांत करतं. या पाण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात. तांब्याच्या भांड्यात साचलेले पाणी ताम्रजल म्हणून ओळखले जात. हे पाणी पूर्णपणे शुद्ध असत. हे सर्व प्रकाराच्या जिवाणूंना पूर्णपणे नष्ट करत.

चला तर बघुयात तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे-

1.अतिसार, कावीळ, या सारख्या आजाराशी लढायला हे पाणी फायदेशीर ठरत.

2.तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने प्यायल्यानं पोटातील आतडी स्वच्छ होतात ज्यामुळे शरीरावर चांगला        प्रभाव पडतो.

3.कोलेस्ट्राल कमी करण्यात भरपूर फायदेशीर ठरते.

4.कर्करोगाच्या समस्ये विरुद्ध लढण्याची समस्या तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्यानं दूर होते.

5.तांबा हे प्यूरिफायरचे काम करतं. पाण्यातील अशुद्धींना दूर करतं.

6.तांब्याचे पाणी शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी प्रभावी आहे. हे लिव्हर आणि किडनीला निरोगी ठेवतं आणि      कोणत्याही प्रकाराच्या संसर्गाला सामोरी जाण्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी फायदेशीर असतं.

7.तांबा हे रक्तशुद्ध करण्याचे काम करतो. या मुळे त्वचेशी निगडित त्रास बरे होतात.

8.पोटात दुखणे, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला या त्रासापासून त्वरित         मुक्ती मिळते.

9. शरीरातील जखमा अंतर्गत किंवा बाह्य असतील त्वरित बरे होण्यात मदत करणे फायदेशीर ठरते.