Notifications

दरड हटवण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर १२ ते २० मार्चपर्यंत ब्लॉक; बघा वेळापत्रक

By PCB Author

March 08, 2019

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) –  पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड हटवण्यासाठी १२ ते २० मार्च यादरम्यान ब्लॉक घेतले जाणार आहेत. खंडाळा बोगद्याजवळ दर तासाला १५ मिनिटांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी ब्लॉक दरम्यान काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ ते २० मार्च यादरम्यान पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.