Pune

दम असेल तर समोर या; शिवसेना नेत्याचे मनसे आमदाराला आव्हान!

By PCB Author

October 12, 2018

पुणे, दि. १२ (पीसीबी) – दम असेल तर समोर या. तुमचे पुरावे दाखवा, असे आव्हान शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी मनसे आमदार शरद सोनेवणे यांना केले आहे. त्यामुळे, शिवसेना मनसेमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

खासदारांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा खोटा खटाटोप आमदार सोनवणे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.” धमक असेल तर विकास कामाचे पुरावे घेऊन समोर या’, असे आवाहन बुचके यांनी केले आहे. दरम्यान, खासदारांच्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.