Pune Gramin

दमदाटी करून चक्क कारचं नेली पळवून…

By PCB Author

January 22, 2021

चाकण, दि. २२ (पीसीबी) – रात्रीच्या वेळी रस्त्यात कार अडवून चालकाला दमदाटी करून दोघांनी मिळून सात लाखांची झायलो कार जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली. याबाबत गुरुवारी (दि. 21) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश परशुराम चिंचने (वय 23, रा. चाकण. मूळ रा. कर्नाटक) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिंचने हे कार चालक आहेत. ते मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास निघोजे येथील स्पायसर रोडने झायलो कार (एम एच 14 / जी डी 3235) घेऊन जात होते. सॅनी कंपनी जवळ दोघांनी त्यांच्या कारला मोपेड दुचाकी आडवी लावून कार अडवली. त्यानंतर चिंचने यांच्या कारची चावी काढून घेऊन दमदाटी करत सात लाखांची कार दोघांनी जबरदस्तीने चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.