दत्ता सानेंच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादीचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा  

0
506

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी –चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे जनसंपर्क कार्यालय तोडफोड केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच दत्ता साने आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयावर आज (मंगळवार) मोर्चा काढण्यात आला आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, संजय वाबळे, प्रशांत शितोळे, नगरसेविका संगीता ताम्हणे, शमीम पठाण, फजल शेख, विशाल काळभोर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यालय तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अद्याप अटक करण्यात का आलेली नाही. याबाबत पोलिसांचा तपास कोठे पर्यंत आलेला आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी विचारणा केली. तसेच विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. पसार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.