थ्री इडियट्स’ फेम सोनम वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

0
421

मुंबई, दि. २६ (पीसीबी)- रियल लाईफमधले फुंगसुक वांगडु म्हणजेच सोनम वांगचुक यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील फुंगसुक वांगडु हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे. लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत.

सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे ice stupa बनवले, लाखो लोकांना /मुलांना प्रयोग करण्याची, innovation ची प्रेरणा त्यांनी दिली. सोनम वांगचुक यांच्या बरोबरीने डॉ़क्टर भारत वाटवानी यांची  सुद्धा रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅगसेस पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो. वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधले ९५ टक्के विद्यार्थी सरकारी परिक्षांमध्ये नापास व्हायचे.

१९९४ साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला कि, १९९६ साली लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण फक्त ५ टक्के होते तेच २०१५ साली ७५ टक्के विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली.