थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने पवना नदीतील छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील गणेश मुर्तीचे हौदात विसर्जन

0
588

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथील पवना नदी घाटावर विसर्जीत करतावेळी छिन्न-विच्छिन्न अवस्थेत पडलेल्या गणरायाच्या मुर्ती नदीपात्रातून बाहेर काढून आज (सोमवारी) विनोदे वस्ती येथील हौदात विसर्जीन करण्यात आल्या.

काल (रविवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरातील गणरायाला भावपुर्ण निरोप देण्यात आला. परंतू बऱ्याच गणरायाच्या मुर्ती विसर्जीत करतेवेळी पाण्यात किंवा काठावर छिन्न-विच्छिन्न अवस्थेत पडतात. नदी पात्रात पडलेल्या श्रींच्या मुर्ती तश्याच पडून राहू नयेत आणि  आणि पवनामैय्या निर्मळ राहावी, यासाठी नदीपात्रातील श्रींच्या मुर्ती बाहेर काढून पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत त्या हौदात विसर्जीत केल्या जातात.

थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही फाऊंडेशनच्या वतीने मानवी साखळी करुन विसर्जित केलेल्या अस्ताव्यस्त मुर्ती नदीपात्रातून बाहेर काढून विनोदे वस्ती येथील हौदात विसर्जीत करण्यात आल्या. यावेळी अनिकेत प्रभू, राहूल सर्वदे, अशोक धुमाळ, सुशांत पांडे, अंकुश कुदळे, शेखर गांगरडे, स्वप्निल तेलंग, राहून जाधव यांनी परिश्रम घेतले.